Click Here For Favorite Posts......

20/recent/ticker-posts

प्यार बहोत महंगा है - राहत indori

आज तक तुमने खिलौने ही ख़रीदे होंगे दिल है ये दिल मेरे सरकार बहुत महंगा है

लाजून हासणे अन हासून हे पहाणे - Lajun Hasane An Hasun Te Pahane Marathi Poem

लाजून हासणे अन हासून हे पहाणे - मंगेश पाडगावकर


लाजून हासणे अन हासून हे पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार हावा?
मिटताच पापण्या अन् का चंद्र ही दिसावा?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे

हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे?
हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे

जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा
देशातुनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्यांचे सुचते सुरेल गाणे


" Lajun Hasane An Hasun Te Pahane - Mangesh Padgaonkar "
" Old Marathi Songs Lyrics "
" Juni Marathi Gani "


Post a Comment

0 Comments