मान वेळावुनी धुंद बोलू नको - मंगेश पाडगावकर
मान वेळावुनी धुंद बोलू नको
चालताना अशी वीज तोलू नको
ऐक माझे जरा
हट्ट नाही खरा
दृष्ट लागेल ग दृष्ट लागेल ग
आज वारा बने रेशमाचा झुला
ही खुशीची हवा साद घाली तुला
मोर सारे तुझे
हे पिसारे तुझे
रूप पाहून हे चंद्र भागेल ग
पाहणे हे तुझे चांदण्याची सुरी
हाय मी झेलली आज माझ्या उरी
लाट मोठी फुटे
शीड माझे कुठे?
ही दिशा कोणती? कोण सांगेल ग?
" Maan Velavuni Dhund Bolu Nako Mangesh Padgaonkar "
" Marathi Kavita "

0 Comments