Click Here For Favorite Posts......

20/recent/ticker-posts

प्यार बहोत महंगा है - राहत indori

आज तक तुमने खिलौने ही ख़रीदे होंगे दिल है ये दिल मेरे सरकार बहुत महंगा है

विश्वास ठेव नारायण सुर्वे | Vishwas Thev - Narayan Surve

विश्वास ठेव - नारायण सुर्वे


इतका वाईट नाही मी ; जितका तू आज समजतेस
दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस

तडजोड केली नाही जीवनाशी ; हे असे दिवस आले
आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले
goodreadsmd1.blogspot.com
हारलो कैकदा झुंजीत ; तूच पदराचे शीड उभारलेस
हताश होऊन गोठलो ; तूच पाठीवर हात ठेवलेस

कसे जगलो आपण , किती सांगू , किती करून देऊ याद
पळे युगसमान भासली ; नाही बोलवत. नको ती मोजदाद.

अशी उदास , आकुल , डोळ्यांत जहर साठवीत पाहू नको
आधीच शरमिंदा झालो आहे ; अधिक शरमिंदा करू नको

आयुष्य घृणेत सरणार नाही ; हवीच तर घृणाही ठेव
ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव.

― नारायण सुर्वे

Post a Comment

0 Comments