Click Here For Favorite Posts......

20/recent/ticker-posts

प्यार बहोत महंगा है - राहत indori

आज तक तुमने खिलौने ही ख़रीदे होंगे दिल है ये दिल मेरे सरकार बहुत महंगा है

सोडून तुझा गेलो संसार तुझ्यासाठी | Sodun Tujha Gelo Sansar Tujhyasathi Suresh Bhat Ghazal

 सोडून तुझा गेलो संसार तुझ्यासाठी - सुरेश भट


सोडून तुझा गेलो संसार तुझ्यासाठी
माझी न हवा झाली आधार तुझ्यासाठी
https://goodreadsmd1.blogspot.com/
एकेक ऋतु जाई लावून तुला मेंदी
एकेक फुलाचा हा शृंगार तुझ्यासाठी

घेऊन तुला गेले आकाश पहाटेचे
होताच कुठे माझा अंधार तुझ्यासाठी ?

माझ्याच कशा वाटा होतात नकारांच्या ?
एकेक दिशा होई होकार तुझ्यासाठी !

कोठून गडे आणू आयुष्य नवे कोरे ?
देहात पुन्हा होती झंकार तुझ्यासाठी !

दारात जरी आला आषाढ तुझा ओला
गाता न मला आला मल्हार तुझ्यासाठी

माझेच मला झाले काही न कळेनासे... 
घेतात कशी गीते आकार तुझ्यासाठी ?

" Suresh Bhat Marathi Gazals "
" Suresh Bhat "
" Suresh Bhat Ghazals "
" सुरेश भट गझल "

Post a Comment

0 Comments