Click Here For Favorite Posts......

20/recent/ticker-posts

प्यार बहोत महंगा है - राहत indori

आज तक तुमने खिलौने ही ख़रीदे होंगे दिल है ये दिल मेरे सरकार बहुत महंगा है

तेव्हा मी हार स्वीकारेल - Tevha Mi Har Swikarel Poem Maharudra Doiphode

तेव्हा मी हार स्वीकारेल - रुद्र


जेव्हा नमतील माझे सूर

आस, अभिलाषा होतील चूर

होईल गीतही हृदयातून दूर

तेव्हा मी हार स्वीकारेल !


भयानं वादळाच्या

ते फिरतील मागं

निखाऱ्यात पाय पडताच

थांबेल कोण सांग

थांबेल सारे जेव्हा लोप पावतील विचार

तेव्हा मी हार स्वीकारेल !


चालावे म्हणून चालणे

या पथांवर धुंद होऊन

अंधार या रात्रीचा

जाळावा दीप होऊन

तिमिरात ही झाला न उजियार

तेव्हा मी हार स्वीकारेल !


धरतीवरती उरून जेव्हा

चमकेन त्या गगनात मी

विझवू न शकला वारा मज तो

असा एक झंझावात मी

घायाळ असूनही न म्हणालो एल्गार

तेव्हा मी हार स्वीकारेल !


           Written by

                    Maharudra Doiphode



"Poet - Maharudra Doiphode"

"Maharudra Doiphode Poems "

"Maharudra Doiphode Marathi Kavita "

"Maharudra Doiphode Motivational Poems"

"Maharudra Doiphode Inspirational Poems "

"Tevha Mi Har Swikarel " 

"Maharudra Doiphode Marathi Poems "


Copyright © 2020 Maharudra Doiphode.

Post a Comment

0 Comments