Click Here For Favorite Posts......

20/recent/ticker-posts

प्यार बहोत महंगा है - राहत indori

आज तक तुमने खिलौने ही ख़रीदे होंगे दिल है ये दिल मेरे सरकार बहुत महंगा है

व्यर्थच होते - Vyarthach Hote Gazal Maharudra Doiphode

व्यर्थच होते - महारुद्र


मी   तेव्हा  एकटाच  हसलो

सारे चेहरे तर उदासच होते


मीच होतो तेव्हा स्तब्ध एकांत

ते  तर पेटते  निखारेच  होते ?


हसऱ्या चेहऱ्यानी पाहिले मज तू

माझे मात्र डोळे तेव्हा नशेत होते


निनादली असतील पैंजणे तुझी तालात

मन   माझे   तुजलाच   शोधत    होते


लागली होती चाहूल येण्याची तुझ्या

माझ्या कुठे मालकीचे हे वारे होते ?


उच्चारण्यास  तुझे  नाव माझ्या ओठी

लोक किती उतावीळ ऐकण्यास होते


का  तू  असे  माझ्यावर रुसावे ?

हे शांत वारे मजला छळत होते


समजेल तुजला ? उमजेल काही ?

माझे   सारे  शब्द     व्यर्थच होते !


                    Poet - Maharudra Doiphode


"Vyarthach Hote Marathi Gazal"

"Mi Teva Ektach HAslo Saare Chehre Tar Udasach Hote Maharudra Doiphode Marathi Poem"

"Maharudra Doiphode Sad Poems"

"Maaharudra Doiphode Romantic Poems"

"Maharudra Doiphode Poems"


Copyright ©  2020 Maharudra Doiphode.

Post a Comment

0 Comments