Click Here For Favorite Posts......

20/recent/ticker-posts

प्यार बहोत महंगा है - राहत indori

आज तक तुमने खिलौने ही ख़रीदे होंगे दिल है ये दिल मेरे सरकार बहुत महंगा है

चितेसारखे जाळ मला वा फुलाप्रमाणे माळ मला | Chitesarakhe Jal Mala Va Phula Pramane Mal Mala Ilahi Jamadar Ghazal

चितेसारखे जाळ मला वा फुलाप्रमाणे माळ मला - इलाही जमादार


चितेसारखे जाळ मला, वा फुलाप्रमाणे माळ मला
शब्दाने  हेटाळ  मला, पण नजरेने कुरुवाळ मला

आजाऱ्याला औषध तारी, तशीच तू ही गुणकारी
समज हवे तर पथ्य मला तू, पथ्यासम सांभाळ मला 

विसरशील वा हरवशील मज, नको सोपवू कुणाकडे 
मी कवितेचे पुस्तक हळवे, वाच मला वा चाळ मला 

कल्पनेत येईन भेटण्या, खुले ठेव घर स्वप्नांचे
निवांत भेटू निवांत बोलू, स्पर्शाने गंधाळ मला

मधुमासासम दरवळणारे, कळ्याफुलांचे गाव तुझे
तुझ्या गावची रोज घ्यायची खुडून संध्याकाळ मला
https://goodreadsmd1.blogspot.com/
नकोस लोटू दूर "इलाही', तू तर माझा प्राण सख्या
तुझ्याविणा हे जीवन माझे, वाटे कर्दनकाळ मला   

Ilahi Jamadar Marathi Ghazal

Post a Comment

0 Comments