Click Here For Favorite Posts......

20/recent/ticker-posts

प्यार बहोत महंगा है - राहत indori

आज तक तुमने खिलौने ही ख़रीदे होंगे दिल है ये दिल मेरे सरकार बहुत महंगा है

दारावरून माझ्या त्यांची वरात गेली | Daravarun Majhya Tyanchi Varat Geli Ilahi Jamadar Ghazal

दारावरून माझ्या त्यांची वरात गेली - इलाही जमादार


दारावरून माझ्या, त्यांची वरात गेली 
मेंदीत रंगलेली, बरची उरात गेली

नगरात आज त्यांच्या आहे म्हणे दिवाळी
आम्हीच लावलेली पणती धूरात गेली 

सारी भणंग स्वप्ने माझ्याच मालकीची
जाळीत आसवांना प्रत्येक रात गेली 
https://goodreadsmd1.blogspot.com/

मांडून सर्व जखमा मोजीत बैसलो मी
बेवारशी व्यथांची वस्ती पुरात गेली

वाटा विझून गेल्या, गेले थिजून डोळे
मैफिल जीवनाची हळव्या सुरात गेली

आता कशास त्यांची पारायणे "इलाही"
माझीच भाग्यरेखा परक्या घरात गेली

" Swapnil Bandodkar Songs Lyrics "
" Ilahi Jamadar Marathi Ghazal "
" Best Marathi Ghazals "

Post a Comment

0 Comments